Chinchwad News : घर नावावर करून घेण्यासाठी मुलाकडून वडिलांवर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज –  मुलाने राहते घर त्याच्या नावावर करून देण्यासाठी वडिलांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न करत जीवघेणा हल्ला केला. (Chinchwad News) ही घटना शनिवारी (दि. 11) मध्यरात्री दीड ते तीन वाजताच्या कालावधीत जे ए अगरवाल चाळ, महावीर पार्क चिंचवड येथे घडली.

आईच्या फिर्यादीवरून मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण शिवराम नवकुडकर (वय 41, रा. जे ए अगरवाल चाळ, महावीर पार्क, चिंचवड) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण याच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune News : होळीनिमित्त पुण्यातून एसटी महामंडळ कोकणात सोडणार 62 जादा बसेस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण याला दारूचे व्यसन आहे. दारू पिण्यासाठी तो वारंवार पैशांची मागणी करत असे. प्रवीण याच्या वडिलांच्या नावावर असलेले घर त्याच्या नावावर करण्यासाठी त्याने वडिलांवर दबाव टाकला. प्रवीण याला दारूचे व्यसन असल्याने घर त्याच्या नावावर करून देण्यासाठी वडिलांनी नकार दिला.

तू जिवंत राहिलास तर मला घर मिळणार नाही. त्यामुळे तुझा आज शेवटच करतो, असे म्हणत प्रवीण याने जीवे मारण्याच्या उद्देशाने वडिलांना लाथा मारून जखमी केले.(Chinchwad News) वडील बेशुद्ध पडले असता प्रवीण याने वडिलांवर ब्लेडने वार करून मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रवीण याच्या आई मध्ये पडल्या असता त्यांच्या हाताच्या मनगटावर ब्लेडचे वार झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.