Talegaon Dabhade : लायन्स क्लब तळेगावतर्फे दिव्यांग शिक्षकांचा सन्मान करून शिक्षक दिन साजरा

एमपीसी न्यूज- लायन्स क्लब तळेगावतर्फे यंदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तळेगावातील जय वकील स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड आॅफ स्पेशल केअर या विशेष मुलामुलींच्या शाळेतील दिव्यांग शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी विभागीय अधिकारी दामाजी असबे, विभागीय अध्यक्ष लायन दिनेश कुलकर्णी, सचिव लायन निलेश जैन, खजिनदार सुचित्रा चौधरी व लायन्स क्लबचे सभासद उपस्थित होते.

अध्यक्षा राजेश्री शहा यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्केटीग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कौतुक करून त्याना लागणारे सव॔ साहित्य देण्याचे कबूल केले. प्रस्तावना शाळेच्या संचालिका श्रीमती डोळस यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.