Pune :पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच ! पेट्रोल 88 तर डिझेल 76 रुपये लिटर !

एमपीसी न्यूज- पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. आज सोमवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन आता पेट्रोल 88 रुपये तर डिझेल 76 रुपये झाले आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. दरम्यान, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस आणि अन्य विरोधीपक्षानी आज भारत बंद पुकारला आहे.

पुण्यात रविवारी 87.88 पैसे दराने मिळणारे पेट्रोल आजपासून 88 रुपयांनी विकले जात आहे. तर रविवारी 75.80 दराने मिळणाऱ्या डिझेलचा भाव आजपासून 76 रुपये झाला आहे. त्याप्रमाणे मावळ भागात आजपासून पेट्रोलचा भाव 88.31 पैसे झाला आहे. डिझेलच्या दरातही वाढ होऊन डिझेलचा भाव 76.29 झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.