Chakan : गर्भवती महिलेने घेतला गळफास; खराबवाडी येथील प्रकार

एमपीसी न्यूज- सारा सिटीमधील एका सदनिकेमध्ये एकवीस वर्षीय गर्भवती विवाहितेने दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार खराबवाडी ( ता. खेड ) येथे उघडकीस आला आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरा पर्यंत स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी चाकण पोलिसांत सोमवारी ( दि. 17 ) आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रीती सावनकुमार प्रसाद ( वय – 21 वर्षे, रा. इटेली, ता. लालगंज, जि. आजमगड, उत्तरप्रदेश, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड,) असे या विवाहितेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आत्महत्येपूर्वी तिने एक मृत्युपूर्वचिट्ठी लिहून ठेवली असल्याचे येथील पोलिसांनी सांगितले. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.