Talegaon : जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या श्लोक ढमाले याचे नेत्रदीपक यश

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या पै सचिनभाऊ शेळके कुस्ती संकुलाचा विद्यार्थी श्लोक उमेश ढमाले याने नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकविला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व कै. पै रंगनाथन मारकड कुस्ती केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ही स्पर्धा मंगळवार दि 25 सप्टेंबर 2018 रोजी कै पै रंगनाथन मारकड कुस्ती केंद्र इंदापूर येथे आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत बाळासाहेब शेळके एज्युकेशन सोसायटीतर्फे इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या पै सचिनभाऊ शेळके कुस्ती संकुलाचा विद्यार्थी श्लोक उमेश ढमाले याने नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकविला तसेच सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

श्लोक उमेश ढमाले याला क्रीडाशिक्षक विशाल मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. इंद्रायणी इंग्लिश स्कूल व इंद्रायणी उद्योग समुहाचे संचालक संतोष बाळासाहेब शेळके यांनी श्लोक ढमाले या विद्यार्थ्याचे अभिनंदन करून विशेष कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.