Hinjawadi : देवळातील देवही नाही सुरक्षित ! खंडोबा मंदिरातून हजारोंचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – देवळातील देव देखील चोरांपासून सुरक्षित राहिलेला नाही. मंदिरातील देवाचे दागिने आणि ठेवलेले पैसे देखील चोरटे चोरून नेत आहेत. भोसरीत मंदिराची दानपेटी फोडून 17 हजारांवर डल्ला मारल्याच्या घटनेनेनंतर लगेच बावधन मधील खंडोबा मंदिरात चोरट्यांनी चोरी केली. यामध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 9) पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली.

सूर्यकांत पांडुरंग भुंडे (वय 33, भुंडे वस्ती, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन भुंडे वस्ती येथे खंडोबा मंदिर आहे. हे मंदिर शनिवारी रात्री साडेअकरा वाजता बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील सेफ्टी डोअरचा कोयंडा तोडून मंदिरात प्रवेश केला. मूर्तिजवळ ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 44 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. रविवारी पहाटे पाच वाजता मंदिर उघडण्यासाठी पुजारी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलोस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.