Bhosari : कडी-कोयंडा उचकटून साडेतीन लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी साडेतीन लाखांची रोकड लंपास केली. भोसरीतील संत तुकारामनगर परिसरात शुक्रवारी (दि. 8) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

शहाजी कुंडलिक नरे (वय 48, रा संत तुकारामनगर, आळंदीरोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास नरे हे सहकुटुंब बाहेर गेले होते. दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट उचकटून त्यातील 3 लाख 53 हजार रुपायांची रोकड चोरून पोबारा केला. दुपारी दोनच्या सुमार नरे घरी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.