Pimpri : तरुणाच्या दुचाकीवर जबरदस्तीने बसून लुटणा-यास अटक

एमपीसी न्यूज – चहा पिण्यासाठी आलेल्या तरुणाच्या दुचाकीवर जबरदस्तीने बसून त्यास काही अंतरावर लुटण्यात आले. याबाबत पोलिसांना माहिती देऊन फिर्यादी तरुणाने लुटारूला पकडून दिले. ही घटना पिंपरी येथे शनिवारी पहाटे घडली.

संतोष नारायण गायकवाड (वय 40, रा. विजयनगर, डी. पी. रोड, काळेवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अमर हिरामण दणके (वय 20, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या लुटारूचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गायकवाड हे चहा पिण्यासाठी पिंपरीत रेल्वे स्टेशनजवळ आले होते. चहा पिऊन घरी जात असताना आरोपी दणके याने गायकवाड यांना थांबविले. त्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवर बसून ती भाजी मंडईच्या दिशेने नेण्यास सांगितले. भीमनगर, भाजी मंडईच्याजवळ पुलाखाली अंधाऱ्या जागेत नेऊन गायकवाड यांच्या खिशातील पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. अनोळखी व्यक्‍तीबाबत गायकवाड हे तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत जात असताना त्यांना आरोपी दणके हा पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा दिसला. गायकवाड यांनी पोलिसांना याबाबत सांगितले असता पोलिसांनी त्यास अटक केली. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.