Pune :  एक कोटी 70 लाखांची लाच स्वीकारणार्‍या वकिलास पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज –  तब्बल एक कोटी 70 लाखांची लाच स्वीकारणार्‍या वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.

आज बुधवारी ( दि 26)  वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंडगार्डन परिसरात 1 कोटी 70 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. रोहित दत्तात्रय शेंडे (वय 27, रा. सहकारनगर स्वामी विवेकानंद सोसायटी,पुणे) असे लाच स्वीकारणार्‍या वकिलाचे नाव आहे.
या प्रकरणी एका 29 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्याकडे असलेल्या कूल मुखत्यार पत्रा अन्वये उपसंचालक भुमी अभिलेख यांचे कार्यालयात प्रलंबित असलेल्या अपिलामध्ये उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याकडून तक्रारदार यांच्या बाजूने निकाल लावून देण्यासाठी व तसा आदेश मिळवून देण्यासाठी संबंधित उपसंचालक भूमी अभिलेख यांना देण्यासाठी रोहित शेंडे या वकिलाने 2 कोटीची लाच मागितली होती.

लाच मागितल्याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार दिली असता आज रोहित शेंडे या वकिलास तडजोडीअंती एक कोटी 70 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. यामध्ये पाच लाख रुपयांच्या चलनी नोटा व 1 कोटी 65 लाख किंमतीच्या चलनी नोटांच्या आकारांचे कोरे कागद स्वीकारले असता आहे त्याला रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.