निवडणुक कामासाठी पीएमपीएमएलच्या 818 बसेस; दोन दिवस पुणेकरांची गैरसोय अटळ

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या कामकाजासाठी या दोन्ही महापालिकांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे 818 बसेसची मागणी केली आहे. महापालिका निवडणूका या महत्वाच्या असल्यामुळे त्यांच्या मागणीनुसार 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी दरदिवशी 818 बसेस द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे या दोन दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे, अशी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळाने एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळपासून मतदान यंत्रे शहरातील विविध मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी पीएमपीएमएलच्या बसेसच वापर करण्यात येणार आहे. तर 21 फेब्रुवारी रोजी मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रे व कर्मचा-यांना पुन्हा निवडणूक निर्णय कार्यालयात सोडण्यासाठी या बसेसचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन दिवशी शहरातील पीएमपीएमलचे नियोजन कोलमडणार आहे.त्यामुळे यो दोन दिवशी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

{fcomment}

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.