Alandi News : इंद्रायणी नगर मध्ये 82 वर्षाचे आजोबा करत आहेत वृक्षसंवर्धनाचे कार्य

एमपीसी न्यूज : आळंदी येथील इंद्रायणी नगर मध्ये इंद्रायणी नदी तीरावर आळंदी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांच्या मार्फत (Alandi News) येथे विविध वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी दूरदृष्टी ठेवत आवश्यक त्या ठिकाणी वृक्षांच्या येथे पालिकेच्या नळांचे कनेक्शन ठेवले आहेत. त्या वृक्षांचे संवर्धन के के निकम करत असल्याची माहिती सचिन गिलबिले यांनी दिली.

PCMC : कचरा विलगीकरणापोटी सेवा शुल्क; 1 एप्रिलपासून अंमलबजावणी, किती आहे शुल्क? 

के के निकम यांचे वय वर्षे 82 असून ते 4 वर्षांपासून येथे वृक्षसंवर्धनाचे कार्य करत आहेत.येथील वृक्षांना पाणी घालणे,पावसाळ्यात वृक्षां भवतील गवत कापणे इ.कामे (Alandi News)  ते करताना दिसतात.वयाच्या 82 व्या वर्षी सुध्दा ते वृक्षसंवर्धन कार्य मोठ्या उत्साहात करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे आळंदीकर नागरिकांडून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.