Pune : भारतातील लोकप्रिय वॉव पुरस्काराने पुण्यातील तीन पुरस्कारार्थी सन्मानित

एमपीसी न्यूज- ‘ब्लिस इक्विटी’तर्फे सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांचा प्रतिवर्षी वर्थनेस बिझनेस अँड एज्युकेशन अवॉर्ड – ‘वॉव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येतो. विविध क्षेत्रातील उद्योजक, कलाकार, दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि राजकारणी यांसारख्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षी पुण्यातील तीन पुरस्कारार्थी या सन्मानासाठी पात्र ठरले आणि त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये सरीता राठी, आदित्य लोणारी, नेविल भास्करन यांच्या सामाजिक संदेश देणार्‍या ‘बीस का लक’ या शॉर्ट फिल्मचा समावेश होता, अशी माहिती सचिन सूर्यवंशी यांनी दिली.

या पुरस्काराबाबत आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी सरिता राठी, आदित्य लोणारी, नेविल भास्करन उपस्थित होते.

‘वॉव पुरस्कार’ विविध श्रेणीत देण्यात येतात. यामध्ये सरिता राठी यांना ‘एज्युकेटिंग इंडिया’, आदित्य लोणारी याला ‘महत्वाकांक्षी तरूण उद्योजक’ तर शॉर्ट फिल्म ‘बीस का लक’ ला ‘बेस्ट फिल्म ऑफ द इअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सरीता राठी यांनी अ‍ॅबॅकसच्या माध्यमातून अनुकरणीय कौशल्याद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शिक्षण सेवा दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. 2006 सालापासून त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांना अ‍ॅबॅकसचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या मते शिक्षकाला उत्तम प्रशिक्षण मिळाल्यास तो अनेक उत्तम विद्यार्थी घडवू शकतो. अ‍ॅबॅकसच्या प्रशिक्षणाने विद्यार्थी सक्रिय आणि समाजशील होतो. त्यांनी आत्तापर्यंत ५०० हून अधिक शिक्षक आणि विद्यार्थी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे.

आदित्य लोणारी हा एका शेतकर्‍याचा मुलगा असून, नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे त्याचे छोटे गाव आहे. आपले गाव विकसित करण्याची त्याची तीव्र इच्छा आणि दृढनिश्चय आहे. या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले आणि स्वत:ची ‘स्कीव्हर आय टी सोल्युशन’ ही सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. आज या कंपनीच्या पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे शाखा आहेत. त्याच्या या उत्कृष्ठ कामगिरीमुळे त्याच्या पालकांना त्यांच्या छोट्याश्या गावात आनंदी जीवन जगता येत आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.