BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : खंडाळा येथील प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान आरक्षण वगळण्याचा ठराव बहुमताने मंजूर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- लोणावळा शहराच्या द्वितीय सुधारित विकास योजनेत प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान या करिता खंडाळ्यातील वाॅर्ड एच येथे आरक्षित ठेवण्यात आलेली जागा आरक्षणमुक्त करण्याचा ठराव लोणावळा नगरपरिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत 16 विरुध्द 7 मतांनी मंजूर करण्यात आला.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, पक्षांचे सभागृहातील गटनेते व नगरसेवक उपस्थित होते.

2005 साली झालेल्या द्वितीय सुधारित विकास योजनेत खंडाळा एच वाॅर्ड येथे आरएस क्र. 149 ब (भ‍ाग) या ज‍ागेवरील 9500 चौरस मीटर ही जागा आरक्षण क्र. 21 प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान या प्रयोजनासाठी आरक्षित केली होती. सदर जागेचे भूसंपादन करावे अन्यथा जागा आरक्षणातून वगळण्यात यावी याकरिता जागा मालक यांच्यावतीने अॅड. संजय वांद्रे यांनी 29 डिसेंबर 2009 साली व 9 जानेवारी 2019 रोजी नगरपरिषदेला खरेदी नोटीस दिली होती.

लोणावळा नगरपरिषदेने सध्या आरक्षण क्र. 27 हे बगीचा आरक्षण व आरक्षण क्र. 5 हे खंडाळा माध्यमिक शाळा आरक्षण विकसित करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता वाहनतळाच्या जागेचे भूसंपादन प्राधान्यांने करण्यात येणार आहे. त्यातच मराठी शाळाची पटसंख्या कमी होत आहे व खंडाळा भागात नगरपरिषदेची प्राथमिक व माध्यमिक तसेच दोन खासगी शाळा असल्याने खंडाळा येथील सदर शाळा व खेळाच्या मैदानाचे आरक्षण वगळण्यात यावे अशी भूमिका सत्ताधारी भाजपाने मांडली.

मात्र यावर एकमत न झाल्याने सदर ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक राजु बच्चे, गौरी मावकर, पूजा गायकवाड, देविदास कडू, जयश्री आहेर, बिंद्रा गणात्रा, आरोही तळेगावकर, सुर्वणा अकोलकर, सुधीर शिर्के, रचना सिनकर, संजय घोणे, संध्या खंडेलवाल, मंदा सोनवणे, दिलीप दामोदरे या पंधरा जणांनी ठरावाच्या बाजुने मतदान केले तर शादान चौधरी, सुनील इंगूळकर, कल्पना आखाडे, सिंधु परदेशी, भरत हारपुडे, अंजना कडू, सेजल परमार या सात जणांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. अर्पणा बुटाला यांनी मात्र तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

HB_POST_END_FTR-A2

.