BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : लोणावळा शहरात 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरावर बंदी

प्लास्टिक वापर करणार्‍यावर होणार कडक कारवाई

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात 50 मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरावर सम्रग बंदी घालण्यात आली असून बेकायदेशीरपणे प्लास्टिक वापरणे अथवा विक्री करणे असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिले आहे.

शहरातील सर्व दुकानदार, हाॅटेल व्यावसायिक, अस्थापना, कंपन्या यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांना देखील सूचित करण्यात आले आहे. राज्यात व देशात प्लास्टिक बंदीचा कायदा होण्यापूर्वी पासून लोणावळा शहरात प्लास्टिक बंदी करण्यात आली होती. याची कडक अंमलबजावणी करताना काही व्यावसायकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून काही गोडाऊनवर धाडी घालत प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

प्लास्टिक हे विघटित होत नसल्याने त्यांचा पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. नदी नाल्यांमध्ये अडकलेल्या प्लास्टिकमुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यात पुरासारखे प्रकार घडल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. याकरिता नागरिकांनी लोणावळा नगरपरिषद व पर्यावरणाला साथ देत शहरात प्लास्टिक बंदीचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like