Pune : जुन्या बाजारातून 225 कोयते जप्त; पाच जणांना अटक

एमपीसीए न्यूज- पुणे शहरात अलीकडेच घडलेल्या गुन्ह्यांमध्ये कोयता आणि सत्तूरचा वापर झालेला आढळून आला आहे. बहुतांश गुन्हेगारांनी ही हत्यारे जुन्या बाजारातून खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे फरासखाना पोलिसांनी जुन्या बाजारातील पाच दुकानांवर छापे टाकून 232 कोयते व सत्तूर जप्त केले.

_MPC_DIR_MPU_II

मागील काही दिवसात पुणे शहरात झालेल्या हत्यामध्ये कोयत्याचा सरार्स वापर झाल्याचे आढळून आले होते. गुरुवारी दुपारी फरासखाना पोलिसांनी सत्तूर आणि कोयते विक्री करणाऱ्या जुन्या बाजारामधील पाच दुकानांवर छापे टाकून 232 कोयते व सत्तूर जप्त केले. या प्रकरणी जयसिंह शामराव पवार (वय 34, रा. मंगळवार पेठ), निलेश तानाजी साळुंखे (वय 38, रा. सोमवार पेठ ), दिनेश सुखलाल साळुंखे (वय 40 रा. कसबा पेठ), फक्रुद्दीन जैनुद्दीन लोखंडवाला (वय 42 रा. रविवार पेठ) व कासीम नजमुद्दीन छावणीवाला (वय 42 रा. लष्कर) या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कोयते विकणाऱ्यांवर कारवाई करत 232 कोयते जप्त केले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्य्क पोलीस आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस उपनिरीक्षक आरती खेतमाळीस, महेंद्र पाटील, चंद्रकांत लोहोकरे, पोलीस कर्मचारी बापू खुटवड, अमेय रसाळ, केदार आढाव, दिनेश भांदुर्गे, सतीश पठारे, दीपक वर्पे, मयूर पांढरे, मयूर भोकरे, विकास बोऱ्हाडे, बजरंग बिचुकले, सुदाम बाठे, योगिता मिसाळ, प्रतीक्षा सोनावणे, निशा कुंभार यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1