Wakad : बहिणीची छेड काढल्यावरून तरुणाचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बहिणीची छेड काढल्याच्या रागातून दोघांनी मिळून काळेवाडी येथे राहणा-या तरुणाचा गळा दाबून व दगडाने ठेचून खून केला. ही घटना 20 जानेवारी रोजी वारजे स्मशानभूमीजवळ मुठा नदीपात्रात उघडकीस आली. त्यावरून वारजे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा गुन्हा वाकड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

कृष्णा गिराव सोनावणे (वय 22, रा. आदर्श नगर, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी इर्शाद महंमद शेख (वय 28), सोमनाथ उर्फ सोमा पांडुरंग थोरात (वय 27, रा. स्वामी समर्थ कॉलनी, तापकीर नगर, काळेवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कृष्णा काळेवाडी येथे फॅब्रिकेशनचे काम करत होता. त्याने आरोपी सोमनाथ याच्या बहिणीची छेड काढली. तसेच आरोपी इर्शाद याला एक रुपयाची बनावट नोट दिली. या कारणावरून दोघांनी दारू पिऊन कृष्णा सोबत वाद घातला. यामध्ये त्याचा गळा दाबून आणि डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी छोटा हत्ती (एम एच 14 / ई एम 5795) मधून कृष्णाचा मृतदेह नेऊन वारजे येथे स्मशानभूमीजवळ नदीपात्रात फेकून दिला.

20 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कृष्णाचा मृतदेह वारजे पोलिसांना मिळाला. त्यांनी तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना आरोपींनी हा गुन्हा देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्याचे सांगितले. मृत कृष्णा हरवल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल असल्याने हा गुन्हा वारजे पोलिसांनी वाकड पोलिसांकडे वर्ग केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळवे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like