Talegaon Dabhade : दारुंब्रे गावामधे आयोजित निकाली कुस्तीमध्ये पैलवान सचिन सास्टे विजयी

एमपीसी न्यूज- दारुंब्रे गावामधे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व वाघजाई माता उत्सवानिमित्त आयोजित निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात अनेक प्रेक्षणीय कुस्त्या पार पडल्या. शेवटची कुस्ती अक्षय जाधव (गुरुकुल कुस्ती संकुल सोमाटणे ) विरुद्ध सचिन सास्टे (चिंचेची तालीम) यांच्यात झाली त्यामधे सचिन सास्टे विजयी झाले.

विद्यमान सरपंच सोमनाथ वाघोले व माजी सरपंच राजेश वाघोले व माजी उपसरपंच विजय वाघोले यांच्याकडून सरपंच केसरी किताब, चांदीची गदा व रोख रक्कम देवून सचिन सास्टे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी सरपंच सोमनाथ वाघोले, उपसरपंच किरण वाघोले, माजी सरपंच राजेश वाघोले, माजी उपसरपंच विजय वाघोले, माजी उपसरपंच गणेश वाघोले, तुषार वाघोले, कैलास वाघोले, विशाल आगळे, पोलिस पाटिल लक्ष्मण शितोळे, सूर्यकांत वाघोले, गुलाब वाघोले, किरण बाळासाहेब वाघोले (अध्यक्ष आझाद क्रिडा मंडळ), जालिंदर वाघोले, मालोजी वाघोले, राकेश सोरटे, हिरामण सोरटे, संतोष सोरटे, शांताराम वाघोले, गणेश सुभाष वाघोले, लक्ष्मण सावळे, नारायण लोहोर, सुखदेव लोहोर, शरद वाघोले, गणेश विठ्ठल वाघोले, सुरेश वाघोले, उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.