Vadgaon Maval : वडगाव मावळमध्ये रंगले ‘राज्यमंत्री चषक’ कुस्त्यांचे मैदान!; मानाची कुस्ती नगरच्या केवल भिंगारेने जिंकली

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याचे माजी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य राज्यमंत्री चषक निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.एकूण शंभर निकाली कुस्त्या या ठिकाणी पार पडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने शेवटची मानाची निकाली कुस्ती नगरचा केवल भिंगारे याने जिंकली. त्यांना रोख एक लाख रूपये आणि चांदीची गदा देण्यात आली.

तसेच प्रतिक देशमुख सडवली(मावळ) याने राज्यमंत्री चषक कुस्ती जिंकली व तेजल सोनवणे (कुरुळी) हिने व अक्षय जाधव (नेरे) यांनी प्रत्येकी 51 हजाराची निकाली कुस्ती जिंकली.

यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर,पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, पु जि भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ भाजपचे माजी अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष पै रामनाथ वारींगे, माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी सभापती निवृत्ती शेटे, माजी सभापती एकनाथ टिळे उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, नगरसेवक अरुण भेगडे, गुलाबराव म्हाळस्कर, माजी उपसभापती शांताराम कदम, पंचायत समितीचे माजी सदस्य शांताराम काजळे, संभाजी टेमगिरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, संतोष कुंभार, अविनाश गराडे, संदीप काकडे, बाळासाहेब घोटकुले,बाळासाहेब शेलार,जितेंद्र बोत्रे, किरण भिलारे,शामराव ढोरे, संजय पवार, सुनिल चव्हाण,रमण पवार,बाबूलाल गराडे, बाळासाहेब काळोखे,नामदेव भसे, सुधाकर ढोरे,गणेश कल्हाटकर,सचिन पांगारे,दिनेश ढोरे,संतोष म्हाळस्कर,महेंद्र म्हाळस्कर, विशाल खंडेलवाल, ऋषींनाथ शिंदे, पै संभाजी राक्षे आदींसह पुणे जिल्ह्यातील नामवंत पैलवान उपस्थित होते.

देहूगाव तालमीचे वस्ताद महाराष्ट्र्र चॅम्पियन पै. तान्हाजी काळोखे व सोमाटणे गुरुकुल तालीमचे वस्ताद पै शंकर कंधारे यांचे विशेष सहकार्य राहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक उपसभापती शांताराम कदम यांनी केले. सूत्रसंचालन संजय गाडे व अनंता कुडे यांनी व आभार रविंद्र शेटे यांनी मानले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like