Bhosari : डॉक्टर्स डे निमित्त निमा पिंपरी चिंचवड़ यांच्यातर्फे भोसरीमध्ये आयुर्वेदिक वृक्षांची लागवड

एमपीसी न्यूज- डॉक्टर्स डे व कृषिदिनाच्या निमित्ताने नँशनल इंटीग्रेट मेडीकल असोसिएशन (निमा) पिंपरी चिंचवड़ यांच्यातर्फे भोसरीमध्ये आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी कामगारनेते इरफान सय्यद, निमा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सत्यजीत पाटील, सचिव डॉ. अभय तांबिले, डॉ. महेश पाटील, डॉ. प्रताप सोमवशी, डॉ. विलास कुटे, सचिव डॉ. संतोष भांडवलक, डॉ. रमेश केदार, निमा असोसिएशनच्या महिला अध्यक्षा डॉ. खोसे, सचिव कल्पना एरंडे व सर्व डॉक्टर्स तसेच महाराष्ट्र मज़दूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश सर, महाराष्ट्र मज़दूर संघटनेच्या बांधकाम अध्यक्षा उज्वलाताई गर्जे, संघटक प्रीतेश शिंदे आदी उपस्थित होते…

मानवच्या आरोग्यास हितकारक व निसर्गास अनुकूल असणारे वृक्ष व वनौषधी रोपटयाचे जतन केले पहिजे. ही काळाचीं गरज आहे असे मत इरफान सय्यद यांनी केले. झाड़े लावा झाड़े जगवा हा संदेशही त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.