Doctors Day : डॉक्टर्स डे निमित्त कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार

एमपीसी न्युज : रुग्णांसाठी आणि त्यांच्या (Doctors Day) नातेवाईकांसाठी कोरोनाकाळात देवदूताची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर्सचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला. शुक्रवारी ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने कोथरुड परिसरातील दहा डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला गेला, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.

‘कोरोनाच्या काळात रात्रंदिवस रुग्णसेवेचे व्रत जपणारे डॉक्टर्स देवदूतच आहेत. त्यांच्या कौशल्याने आणि ज्ञानाने अनेकांना जीवनदान मिळाले. कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांवर उपचार करून आपले कर्तव्य पार पाडले. त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळावी या उद्देशाने हा सन्मान करण्यात आल्याचं कोथरूड राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितलं.

Rename of Pune : पुण्याच्या नामांतराच्या मागणीला 91 टक्के नेटीझन्सचा विरोध

डॉक्टर्स डे चे औचित्य साधून अशा कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. (Doctors Day) त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  डॉक्टर करत असलेल्या कष्टाच्या बळावरच कोरोनाचा लढा आपण यशस्वीपणे लढत आहोत, त्यांच्या या सेवेला सलाम!’, असे गिरीश गुरनानी म्हणाले.

डॉक्टर डे निमित्ताने कोथरूड परिसरातील डॉ. सुहास नेने, डॉ. सुरेश बोरकर, डॉ.अशोक सोहोनी, डॉ.मिताली कुलकर्णी, डॉ.समीर नारकर, डॉ. विजय तरटे, डॉ स्वाती सुराणा, डॉ. एस.एम.भाटे, डॉ बी. एम. गदादे, डॉ. मीना पाटील या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्हं आणि शाल असे सत्काराचे स्वरूप होते.

यावेळी ऋषिकेश कडू, सुनील हरळे, ऋषिकेश शिंदे, तेजस बनकर, पृथ्वी दहीवाळ आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.