Pune : पुणे स्मार्ट सिटीकडून वाहतूक पोलिसांना 80 स्मार्ट बाईक्स, तर अग्निशमन दलास 2 स्मार्ट फायर व्हॅन सुपूर्द

महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज- पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने मंगळवारी (दि. 9) पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागास 80 स्मार्ट पट्रोलिंग बाईक्स, तर महापालिकेच्या अग्निशमन विभागास 2 स्मार्ट फायर व्हॅन सुपूर्त करण्यात आल्या. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या वतीने पोलिसांना अत्याधुनिक स्मार्ट बाईक्स देण्याचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे.

यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, पोलीस आयुक्त के. वेंकटेशन, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, अग्निशमन विभागाचे प्रमुख रणपिसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महापौर टिळक म्हणाल्या, “पुणे शहरातील वाहतूक व नागरिक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटीने पुढाकार घेऊन राबविलेले स्मार्ट बाईक व स्मार्ट फायर व्हॅन या दोन्ही प्रकल्प अभिनंदनीय आहेत. यातील आधुनिक सुविधांचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसेल व पुणेकर नागरिकांना याचा लाभ होईल”

पुणे स्मार्ट सिटीने स्वयंस्फूर्तीने पोलिसांना ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करताना पोलीस आयुक्त के. वेंकटेशन म्हणाले, “स्मार्ट बाईक्समुळे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात मोठा हातभार लागेल. अशाच प्रकारे विकसित देशांतील उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चौकांमध्ये पोलीस विरहित वाहतूक यंत्रणा पथदर्शी तत्त्वावर राबविली जाईल”

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “अडॅप्टिव ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रकल्पाच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांच्या गरजा लक्षात घेऊन या स्मार्ट बाईक्स खास करून विकसित करण्यात आल्या आहेत. देशातील अशा प्रकारचा प्रकल्प राबविणारी पुणे ही पहिलीची स्मार्ट सिटी असून, वाहतूक व्यवस्थेत याचे योगदान व सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील”

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा या स्मार्ट बाईकमध्ये कॅमेरा, वाहतूक उल्लंघनाचे लाईव्ह शूटिंग, स्मार्टफोन, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम असल्यामुळे टॅफिक कंट्रोल रूमला त्यांची ‘लाईव्ह’ माहिती व ठिकाण कळू शकेल. तसेच सार्वजनिक घोषणा प्रणाली तथा पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टमने सुसज्ज अशी ही बाईक असून त्यासाठी माईकची सुविधा असलेले हेल्मेट आहेत. वाहतूक उल्लंघनाविरुद्ध कारवाईसाठी प्रत्येक बाईकसोबत तीन जॅमर देण्यात आलेले आहेत. एक काढता येईल अशी डिक्की आहे.

स्मार्ट बाईकची वैशिष्ट्ये

1) मोटारसायकलवरील पब्लिक ऍड्रेस सिस्टम (पीए) हेल्मेटला जोडले असताना वाहन चालविताना एकल पोलिस अधिकारी हेल्मेटद्वारे लोकांशी संवाद साधू शकतात.

2) मोटारसायकलींमध्ये सायरन

3) पुढच्या बाजूस फ्लॅश दिवे लावले असल्याने ही स्मार्ट बाईक पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या इतर वाहनांशी मिळतीजुळती दिसते.

4) कॅमेरा अशा प्रकारे ठेवला आहे की त्यात कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचे उल्लंघन नोंदवले जाईल. कॅमेऱ्यासाठी जास्तीत जास्त मेमरी
किमान- 8 एमपी प्रतिमा आणि 1080 पी व्हिडिओ रिझोल्यूशन, वाइड एंगल लेन्स – 170 डिग्री, मेमरी – 64 जीबी किंवा अधिक (मेमरी कार्ड समाविष्ट), वॉटरप्रूफ आणि चित्रीकरणात कमालीची स्थिरता, यूएसबी केबल, चार्जिंग अॅ डॉप्टर इ. समाविष्ट.
– वाहन ट्रॅकिंगच्या उद्देशाने उपयोजित विद्यमान प्रणाली आणि भविष्यात (वायरलेस आणि व्हीटीएस) सिस्टमसह एकत्रीकरण क्षमतेसह जीपीएस ट्रॅकिंग सक्षमित
वाहूतक पोलीस उपायुक्त कार्यालयात ‘मोबाईल ट्रॅफिक कमांड अँड कंट्रोल सेंटर’ आणि ‘ट्रॅफिक कमांड कंट्रोल सेंटर’ ला थेट-प्रवाहाची तरतूद.
5) दुचाकीवर जॅकेट, बॅटन, ई-चलान मशीन, वायरलेस डिव्हाइससाठी मोबाईल पॉकेट इ.
6) हेल्मेट ठेवण्याची सोय.
7) वाहनाच्या मागील बाजूस 3 जैमर ठेवण्याची व्यवस्था
8) पुणे शहर वाहतूक पोलीस आणि पुणे शहर वाहतूक पोलीस, पीएससीडीसीएलचा लोगो यांचा स्पष्ट उल्लेख
9) वाहन जामर्स – प्रति मोटारसायकल युनिट- ३ जॅमर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.