Pune : फास्टटॅग प्रणालीमधील त्रुटी दूर करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – फास्टटॅग प्रणालीमधील त्रुटी दूर करण्याची मागणी फोरम ऑफ इनोव्हेशन अँड ऍप्लिकेशनच्या वतीने चिन्मय कवी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन कवी यांनी नवी दिल्ली येथे गडकरी यांना दिले आहे. याबाबत त्वरित कार्यवाहीचे आदेश गडकरी यांनी दिल्याचे चिन्मय कवी यांनी सांगितले.

फिन ॲप संस्थेमार्फत चिन्मय कवी हे विविध समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी प्रयत्न करत असतात. नुकतीच संपूर्ण देशभर फास्टटॅग प्रणाली लागू झाली. यामध्ये एका वेळेच्या टोलपासचा दर 75 रुपये असेल तर परतीच्या प्रवासात पुन्हा 75 रुपये टोल भरावा लागणार असल्याचे कवी यांच्या निदर्शनास आले. परंतु, यापूर्वी जाण्यायेण्याच्या पास हा सवलतीच्या दरात 110 रुपये होता. मात्र नवीन प्रणालीत सवलत न मिळता दोन्ही वेळेस तेवढेच पैसे आकारले जाणार आहेत.

या त्रुटी संदर्भात कवी यांनी गडकरी यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले. गडकरींनी या सूचनेचे स्वागत करून त्वरित याबाबतची माहिती घेऊन कार्यवाहिचे आदेश दिल्याचे कवी यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.