Pune : राज्यमंत्री विश्वजित कदम उद्या पुण्यात

कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागताची तयारी

एमपीसी न्यूज – काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री झाल्यानंतर विश्वजित कदम प्रथमच मंगळवारी (दि.7) पुण्यात येत आहे. पुण्यातील काँगेस कार्यकर्त्यांनी कदम यांचे स्वागत करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

सकाळी 9 वा. कसबा गणपतीचे दर्शन, 9.20 वा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शन, नंतर केसरीवाडा, फुलेवाडा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन नंतर डेक्कन येथील बांगला येथे विश्वजित कदम मुक्काम करणार आहेत.

दरम्यान, आगामी काळात पुणे शहरातील काँगेसचे नेतृत्व विश्वजित कदमच करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागताची तयारी सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.