Pimple Saudagar: नोकरीच्या अमिषाने डॉक्टर तरूणीची फसवणूक
एमपीसी न्यूज – टाईम्स जॉब कंपनीतून बोलत असल्याचे खोटे सांगून एका डॉक्टर तरूणीची सुमारे 60 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपळे सौदागर येथे नुकतीच घडली.
दिप्ती सदाशिव नागले (वय 33, रा. कोकणे चौक, पिंपळे सौदागर) असे फसवणूक झालेल्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिशीका नामक महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दंतचिकित्सक असून त्यांना नोकरीची गरज आहे. आरोपी मिशीकाने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून टाईम्स जॉब कंपनीतून बोलत असल्याचे खोटे सांगितले. त्यांना www.timesjobsregistration. com ही लिंक पाठविली. त्यांच्याकडून 60 हजार रूपये घेऊन ऑनलाईन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक गुळींग तपास करत आहेत.