Talegaon Dabhade : विशाल भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
एमपीसी न्यूज -श्री. डोळसनाथ तालीम मंडळाचे कार्यकर्ते विशाल सोपानराव भेगडे (वय 38) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी, चुलते ,पुतणे असा परिवार आहे.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असायचा.
प्रसिद्ध बैलगाडामालक सोपानराव भेगडे यांचा तो मुलगा तर नगरसेविका शोभा भेगडे यांचा तो दीर तर उद्योजक शामराव भेगडे, अरुण भेगडे यांचे ते बंधू होत