Pune : मित्राच्या मृत्यूची खबर मिळताच दुसऱ्यानेही सोडले प्राण; हृदय हेलावणारी बारामतीतील घटना

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील बारामती इथून हृदय हेलावून टाकणारी एक घटना उघडकीस आली आहे. मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासात दुसऱ्या मित्राचा मृत्यू झाला. यातील एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर मित्राच्या मृत्यूची खबर ऐकून दुसऱ्यानेही प्राण सोडले.(Pune) रामचंद्र किसन कोरडे आणि अशोक गणपत होळकर असं या दोन जीवलग मित्रांचे नाव आहे. दोघेही ‘जय-वीरू’ नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. 

दोघेही बारामतीतील सोमेश्वर साखर कारखान्यात काम करत होते. रामचंद्र कोरडे हे बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी येथून सोमेश्वर कारखान्यात कामाला येत होते. तर अशोक होळकर हे बारामती तालुक्यातील होळ येथून सोमेश्वर कारखान्यात कामाला येत होते. एकाच दिवशी दोघेही कारखान्यात कामावर रुजू झाले होते. त्यानंतर तब्बल 22 वर्षे दोघं एकत्रच असायचे.

Pune : वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचला रिक्षा चालकाचा जीव

एकत्र काम करणे, एकत्र फिरणे, एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होणे यामुळे त्यांची मैत्री घट्ट बनली होती. इतकंच नाही तर त्यांच्या दोघांची जोडी पंचक्रोशीत ‘जय-वीरू’ या नावाने प्रसिद्ध होती.(Pune) एकाच दिवशी या दोघांचा मृत्यू झाल्याने बारामती तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.