Pune : वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचला रिक्षा चालकाचा जीव

एमपीसी न्यूज : सिग्नलवर वाहतूक नियमन करताना (Pune) फिट आल्याने रिक्षा चालक जागेवरच कोसळला. पण, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने त्या रिक्षा चालकावर तत्काळ उपचार मिळाले अन् त्याचा जीव वाचला आहे. रिक्षा चालकाने पोलिसांचे भरल्या डोळ्यांनी आभार मानले. 

पोलीस नाईक रविंद्र शेंडगे व पोलीस हवालदार सतीश सोनवणे असे या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी उत्तमकामगिरीमुळे कर्मचाऱ्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले आहे. उत्तम गायकवाड असे या रिक्षा चालकाचे नाव आहे.

Pune : येरवड्यातील बालसुधारगृहातून आणखी चार मुले पळाली

उत्तम गायकवाड हे रिक्षा चालक आहेत. गेल्या आठवड्यात ते रिक्षाने परिहार चौकातून जात होते. यादरम्यान, पोलीस नाईक रविंद्र व सतीश सोनवणे वाहतूक नियमन करत होते. त्याचेवळी धावता रिक्षा अचानक थांबला गेला. पाहिल्यानंतर रिक्षा चालकला फिट आल्याचे दिसून आले. (Pune) लागलीच रविंद्र शेंडगे व सतीश सोनवणे यांनी येथे धाव घेतली. वर्दळीची वेळ असल्याने मोठी गर्दी जमली.

कर्मचाऱ्यांनी फिट आल्याचे लक्षात येताच रिक्षा चालकाला बाहेर काढले व चावीने त्याचे हात व पाय चोळले. दहा ते पंधरा मिनिट त्याला उपचार दिल्याने रिक्षा चालक पुर्ण शुद्धीवर आला. त्याला तत्काळ मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. त्याने वाहतूक पोलिसांचे आभार मानले. नागरिकांनी देखील पोलिसांच्या या कामाचे टाळ्या वाजवून कौतूक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.