Talegaon Dabhade : निर्मला भेगडे यांचे अल्पशा आजाराने निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील निर्मला पोपटराव भेगडे (वय67) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे पती, दोन मुले, विवाहित मुलगी, सुना, पुतणे ,नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असायचा.

मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पोपटराव भेगडे यांच्या त्या पत्नी तर, उद्योजक महेश भेगडे, राजेश भेगडे यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.