Lonavala: लोहगड येथे शिवजयंती उत्साहात

एमपीसी न्यूज – लोहगड विसापूर विकास मंच व ग्रामस्थांच्या वतीने किल्ले लोहगड येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

गडपायथ्याशी असणारे शिवस्मारक फुलांनी व रोषणाई करून सजवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. मंचाच्या वतीने शिवजयंतीच्या पूर्वरात्रीला लोहगडावर शिवज्योत नेण्यासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

सदर व्यवस्थापन विश्वास दौडकर, सागर कुंभार, अजय मयेकर, गौरव गरवड, संदीप भालेकर, राहुल वाघमारे, महेंद्र बैकर, सोमनाथ बैकर, सचिन निंबाळकर आदी कार्यकर्त्यांनी केले होते. तसेच, शिवजयंतीच्या निमित्ताने संस्थापक सचिन टेकवडे, गणेश उंडे यांच्यासह मंचाचे अनेक कार्यकर्ते नतमस्तक होण्यासाठी किल्ले शिवनेरीवर देखील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.