Chinchwad : कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले
एमपीसी न्यूज – रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून लघुशंका करत असलेल्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास चिंचवड येथे घडली.
संजय गुलाबराव राऊत (वय 29, रा. त्रिवेणीनगर, निगडी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत हे शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलजवळून जात होते. लघुशंकेसाठी त्यांनी सातव लॅबजवळ रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी थांबविली. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चार आरोपींनी फिर्यादी राऊत यांना पकडले. त्यांच्या गळ्याला कोयता लावून मोकळ्या जागेत घेऊन गेले. तेथे त्यांच्याकडून 10 ग्रॅम वजनाची सोनसाखळी आणि एक हजार 600 रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून काढून घेतली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत