Pune: कोरोना व्हायरसची भीती कधीपर्यंत? भारताची ग्रहस्थिती काय सांगते?

एमपीसी न्यूज (ज्योतिषभास्कर उमेश स्वामी) – सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूमुळे जगात आतापर्यंत काही हजार बळी घेतले आहेत. महाराष्ट्रात या विषाणूबाधित रुग्णांच्या संख्या हा लेख लिहित असताना 52 पर्यंत पोहचली आहे. सरकारकडून या बाबत योग्य दिशेने व योग्य पद्धतीने निर्णय घेणे चालू आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. जगातील अनेक देश या विषाणूमुळे हादरून गेले आहेत. तर आपल्या भारतात या विषाणूचा प्रसार जास्त प्रमाणात पसरू लागला तर काय होईल, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येणे स्वाभाविक आहे. तर आपण ज्योतिषाच्या आधारे या विषाणूची तीव्रता कधीपर्यंत कमी होईल, ते पाहुयात….

भारताची सर्वसाधारण रास मकर असून सध्या धनु आणि मिथुन राशीत झालेली ग्रहणे व ग्रहस्थिती तसेच 25 डिसेंबरला धनु राशीतून झालेले बुधाचे भ्रमण व पुढे मकर व सध्या कुंभ राशीतून होत आहे. बुध नेपच्यून योग हा वायु राशीतील तर राहु हा आर्द्रा नक्षत्रातून मकर, धनु नवमांशामध्ये गोचर भ्रमण होत असून, सगळ्यात महत्त्वाचे गुरू, केतू, मंगळ धनु राशीत व मकर राशीच्या व्ययस्थानी होत असून या गोष्टीमुळे सार्वजनिक आपत्ती, संकट किंवा संसर्गजन्य विकार अथवा सामाजिक व्यवस्था बिघडण्यासारख्या गोष्टींची प्रचिती येते. असे मेदनीय ज्योतिषशास्त्रात दर्शवितात. तर या कोरोना विषाणूची भीती कधीपर्यंत याचा आढावा ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार तसेच भारतीय नववर्षाच्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार घेतला आहे.

22 मार्चला झालेले मंगळाचे मकर राशीतील (उच्च राशीतून) 28 मार्चला राशीच्या पंचमस्थानी स्वराशीतून (वृषभ) शुक्राचे भ्रमण होत असून व 29 मार्चला गुरूचे भ्रमण अतिचर मार्गाने धनु राशीतून मकर राशीत होणार आहे. धनु राशीत फक्त केतू राहणार आहे. तर आमच्या मते 22 मार्चनंतर मंगळ धनु राशीतून मकर राशीत गोचर भ्रमण करेल तेव्हा भीतीचे वातावरण कमी होण्यास पूरकस्थिती निर्माण होईल. 29 मार्चला होणारा गुरुबदल कोरोना विषाणूची भीती कमी होण्यासाठी वातावरण तयार करील.

सात एप्रिलला मीन राशीतून होणारे बुधाचे भ्रमण व 14 एप्रिलला उच्च राशीतील (मेष) रवीच्या भ्रमणाच्या प्रभावामुळे कोरोना विषाणूच्या वैद्यकीय उपचारपद्धतीचा शोध लागू शकतो व 22 एप्रिलपर्यंत राहू आर्द्रा नक्षत्रामध्ये आहे, तोपर्यंत कोरोनाची भीती कायम राहू शकते, असे ग्रहस्थिती दर्शविते. सदर लेखन ग्रहस्थितीनुसार केले आहे.

– ज्योतिषभास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तू सल्लागार
99223 11104

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.