Chinchwad : मेडिकल दुकान फोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – चार मेडिकल दुकानांची शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाला. ही घटना चिंचवड येथे बुधवारी (दि. 1) पहाटे घडली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नील सुरेश खाबिया (वय 43, रा. तानाजी नगर चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वानऊ ते बुधवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास फिर्यादी स्वप्नील यांचे सन्मती मेडिकल बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून आतील चार ते पाच हजार रुपयांची रक्कम चोरून नेली.
तसेच फिर्यादी यांच्या दुकानाच्या समोरील महावीर मेडिकल, काळेवाडी रोडवरील व्यंकटेश मेडिको आणि रिव्हायवल मेडिको याही मेडिकल दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.