Chikhali : जबरदस्तीने घरात घुसून महिलेने महिलेच्या डोक्यात फोडली काचेची बाटली

एमपीसी न्यूज – जबरदस्तीने घरात घुसून एका महिलेने घरातील महिलेच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 31) रुपीनगर, तळवडे येथे घडली.

श्वेता बाबाजी वाळूंज (वय 27, रा. शिवशक्ती हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी  त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिपाली हेमंत कौटकर (वय 27, रा. दक्षता चौक, रुपीनगर, तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला दिपाली हिने मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करत घरात ड्रेसिंग टेबलजवळ ठेवलेली काचेची बाटली फिर्यादी श्वेता यांच्या डोक्यात मारून दुखापत केली.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.