डॉक्टर्स, पत्रकार, साधू यांच्या बाबत राजकारण का?

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) – कोरोनाच्या या संकट काळात बातम्या लावल्या किंवा वाचायला घेतल्या की कळते आज इकडे इकडे अमुक डॉक्टर्सवर हल्ला, डॉक्टरांना काही ठिकाणी उपचार करण्यापासून रोखलं जातंय. काय चाललंय काय? आधीच कोरोनाच्या या सगळ्या दुष्टचक्रामुळे समाज एक प्रकारची अस्थिरता अनुभवतोय, त्यात गरज आहे आशादायक बातम्यांची, तर बातम्या काय? तर पालघर येथे दोन साधुंवर जमावाकडून प्राणघातक हल्ला, त्याची चौकशी चालू आहे, त्याची अजून सखोल, अन निरपेक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या अर्णव गोस्वामी या संपादकावर घरी जाताना हल्ला होतो, त्यांची भाषा, त्यांचे मुद्दे पटत नसतील तर, तर्कसंगत मुद्दे मांडुन त्याला उत्तर देताना आलं असतंच की, पण आजकाल हे जे हल्ल्यांचे राजकारण शस्त्र म्हणून जे वापरले जातय, ते घातक आहे.

पत्रकार, डॉक्टर्स , पोलीस हे  या सध्याच्या परिस्थितीत जीवावर आधीच उदार होऊन काम करत असताना, हे असं होणं पटत नाही. राज्य, देश हा कायद्याच्या पायावर चालतो, जर कायद्याला जुमानले जात नसेल तर, कायदा आपले काम कठोरपणे करायला सक्षम असतो, अन असायला ही हवा.

तुम्हाला एखाद्याचे पटत नसेल तर नका वाचू त्यांचं काही, नका पाहू त्यांचा चॅनेल, काय असते?

अर्णव गोस्वामी प्रकरणात अजून एक डेंजरस गोष्ट समोर येते की, काही पत्रकारच समाज माध्यमांवर हल्ल्याचे उघड उघड समर्थन करताना दिसतात. लाज वाटते आम्हाला? आमच्याच सम व्यवसायी, पेशातल्या “माणसावर” भ्याड हल्ला होतो, आणि आम्ही निर्लज्जपणे असंच पाहिजे म्हणतो, आपण सगळे माणूस कधी होणार, हा खरा प्रश्न आहे, कोरोनाच्या या संकट काळात आशा होती की, घरात राहिल्याने आत्मचिंतन वैगेरे होईल, पण कदाचित, तसं काही होताना तूर्त दिसत नाही आहे, आशावाद ठेवायला हरकत नसावी

 

लेखक – हर्षल आल्पे 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.