Mumbai : लाडक्या ‘ब्रुनो’च्या मृत्यूने विराट अनुष्का बुडाले दु:खात

एमपीसी न्यूज : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या अत्यंत लाडक्या ‘ब्रुनो’ या श्वानाचा मृत्यू झाला आहे. विरुष्कासाठी ही फारच धक्कादायक आणि दु:खद घटना असून, ते दोघेही शोकसागरात बुडाले आहेत.

पाळीव प्राण्याशी आपले भावनिक बंध जोडलेले असतात. त्यात तो पाळीव प्राणी सेलिब्रेटींचा असेल तर प्रत्येकजण देवाजवळ नक्कीच अशी प्रार्थना करेल की देवा मला पुढचा जन्म असाच दे. कारण तेथे त्याचे लाड होतात, फोटोशूट होतात, प्रसिद्धी मिळते. समर्थाघरचे श्वान त्याला सर्वचजण देती मान, असे म्हटलेलेच आहे.

अशाच एका सेलिब्रेटीच्या कुत्र्याचा मृत्यू झाला. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली म्हणजे आपल्या ‘विरुष्का’च्या ‘ब्रूनो’ या श्वानाचा मृत्यू झाला. हा श्वान साऱ्यांच्याच लक्षात असेल. कारण विरुष्काच्या ब-याच फोटोंमध्ये ब्रुनो असायचाच. अनुष्काने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. अनुष्काप्रमाणेच विराटनेदेखील एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

ब्रुनो हा विरुष्काचा सर्वात लाडका श्वाना होता. वयाच्या ११ व्या वर्षी ब्रुनोचा मृत्यू झाला. विरुष्कासाठी ही फारच धक्कादायक आणि दु:खद घटना आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“या ११ वर्षात आमच्या आयुष्यात आनंद, प्रेम तुझ्यामुळे आलं. हे आजन्माचं नातं तयार केलंस. आज तू आणखी चांगल्या ठिकाणी गेला आहे. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो, ब्रुनो”, अशी पोस्ट विराटने शेअर केली.

त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, विराट आणि अनुष्का यांनी इन्स्टाग्रामवर ब्रुनोसोबत बरेच फोटो शेअर केले आहेत. ब्रुनोव्यतिरिक्त त्यांच्याकडे एक लॅब्राडोर ड्यूडदेखील आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.