Talegaon : विनाकारण शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरासमोर लाकूड तोडण्याचे काम करत असलेल्या बाप-लेकाला एकाने विनाकारण येऊन शिवीगाळ केली. तसेच मारहाण करून दोघांना जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात घडली.

सागर शंकर भांडवलकर (वय 25, रा. साळुंब्रे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल कान्हू शेळके (रा. साळुंब्रे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी फिर्यादी सागर आणि त्यांचे वडील त्यांच्या घरासमोर लाकूड तोडण्याचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी रस्त्याने जाता -जाता सागर यांच्या जवळ आला आणि सागर यांना शिवीगाळ करू लागला. सागर यांनी त्याला शिवीगाळ करण्याचा जाब विचारला.

त्यानंतर आरोपीने सागर यांना हाताने मारहाण केली. शेजारी काम करणारे सागर यांचे वडील हे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपीने त्यांनाही दगडाने मारून जखमी केले. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.