New Delhi : देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 977 नवे कोरोना रूग्ण; 154 जणांचा मृत्यू
एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 977 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 154 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहचली आहे.
देशातील एकूण 1 लाख 38 हजार 845 रुग्णांपैकी सध्या 77 हजार 103 जणांवर उपचार सुरू आहेत, तर आजपर्यंत 57 हजार 720 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनामुळे देशात 4 हजार 021 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.
भारतात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून, गेल्या दोन दिवसांत यामध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. रविवारी (दि.24) भारताने इराणला मागे टाकत करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत 10 व्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.
अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्थान नंतर आता 10 व्या क्रमांकावर भारत पोहोचला आहे.
जगातील दुसरी सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेल्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 13 दिवस झाला आहे. देशात जून जुलै महिन्यात कोरोना रुग्णांचे पीक दिसून येण्याची शक्यता भारतीय वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.