Chakan : म्हाळुंगे – वराळे रस्त्यावर भरधाव कार उलटून एक ठार

rash car overturned in Mhalunge-varale Road, killing one ; कार चालक भरधाव वेगाने व वाहतूकीचे नियम दुर्लक्ष करून चालवत होता.

एमपीसी न्यूज – भरधाव फोर्ड कार उलटून झालेल्या अपघातात म्हाळुंगे गावचा अठरा वर्षीय तरुण ठार झाला. ही घटना मंगळवारी (दि.14) सायंकाळी सहाच्या सुमारास म्हाळुंगे – वराळे रस्त्यावर घडली.

नयन बाळू भोसले ( वय. 18, रा. म्हाळुंगे, ता. खेड, पुणे), असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शरद माणिक भोसले ( वय. 30, रा. म्हाळुंगे, ता. खेड, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार ज्ञानेश्वर सोपान वैद्य ( रा. चाकण, ता. खेड, पुणे) या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहित नुसार, चालक ज्ञानेश्वर हा त्याची फोर्ड एन्डेव्हर ( एमएच 14 जेए 2020) ही कार म्हाळुंगे – वराळे रस्त्यावर भरघाव वेगाने व वाहतूकीचे नियम दुर्लक्ष करून चालवत होता. या कारमध्ये नयन भोसले सुद्धा होता.

त्यावेळी अचानक पाठीमागे वळून पाहत असताना त्याचा कारवरील ताबा सुटला व कार रस्त्यावर उलटली. या अपघातात नयन भोसले याचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.