Nigdi : ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील कनक महात्मा हिला 100 टक्के, विद्यालयाचा निकालही 100 टक्के

अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार हेच तिच्या यशाचं गमक असल्याचे कनकच्या आईने सांगितले.

एमपीसी न्यूज – माध्यमिक शालान्त परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. या परिक्षेत निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात शिकणारी कनक योगेश महात्मा हिला दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले असून विद्यालयात ती प्रथम आली आहे. 

याच शाळेतील संस्कृती मगदूम हिला 99.80% तर श्रावणी विधाटे हिला 99.40% मिळाली असून त्यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचा दहावीचा निकालही 100 टक्के लागला आहे.

दहावीत 100 टक्के मिळवलेल्या कनक महात्मा हिच्या आईला आम्ही जेव्हा मुलीच्या यशाबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की, कनकने 100 टक्के मिळवण्याच्या दृष्टीनेच अभ्यास केला असे सांगितले. तसेच अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार हेच तिच्या यशाचं गमक असल्याचे त्या म्हणाल्या. कनकला पुढे जाऊन आर्किटेक्ट व्हायचं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.