Chinchwad News: आरोग्य सेवक व स्टाफ नर्स पाठोपाठ बिर्ला हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे धरणे आंदोलन 

हॅास्पिटल व्यवस्थापनावर केले गंभीर आरोप

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या आरोग्य सेवक आणि स्टाफ नर्स यांच्या आंदोलनानंतर आता बिर्ला हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हॅास्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. कोरोना काळातील ड्युटी, क्वारंटाईन व्यवस्था, महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि हॅास्पिटल देत असलेल्या मानसिक त्रासाविरोधात त्यांनी हे आंदोलन केले आहे.

एकीकडे आरोग्य सेवक आणि स्टाफ नर्स यांचे आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या व्यवस्थापन विरोधात गेली तीन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. त्यात आता हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत आंदोलन सुरू केले आहे.

सक्तीची ड्युटी, क्वारंटाईन सुविधा, रोटा पॅक्ट, निकृष्ट दर्जाचे जेवण आणि ड्युटी करण्यासाठी केली जाणारी सक्ती यामुळे मानसिक ताण येत आहे. तरीही बिर्ला हॅास्पिटल कडून कामावर हजर राहण्यासाठी सक्ती केली जात असल्याचा आरोप डॅाक्टरांनी केला आहे.

सात दिवस कोरोना रूग्णांची ड्युटी केल्यानंतर लगेच नॅान कोरोना रूग्णांची ड्युटी लावली जात आहे. कोरोना चाचणी साठी पैशांची मागणी केली जात आहे व क्वारंटाईन असलेल्या डॉक्टरांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण होण्याअगोदरच कामावर हजर राहण्यासाठी दबाव आणला जात आहे. डॉक्टरांसाठी क्वारंटाईनची सुविधा असलेला वेगळा विलगीकरण कक्ष मागणी करून देखील उभारला नसल्याचे या डॉक्टरांनी म्हटले आहे.

काही डॉक्टरांची चाचणी केल्यानंतर सुद्धा चाचणी अहवाल येई पर्यंत काम करा काही होत नाही असे सांगितले जात आहे. तसेच चाचणी पॅाझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे सांगितले जात नाही. अशामुळे संसर्ग पसरण्याची आणखी दाट शक्याता आहे. आणि हॅास्पिटलच जर संसर्गाचा केंद्र बिंदू बनत असेल तर ती चांगली बाब नसल्याचे डॉक्टर म्हणाले.

महिलांच्या सुरक्षेसाठी हॅास्पिटल कडून काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यांच्यासाठी चेंचींग रूम, स्वच्छता गृहांची नीट व्यवस्था नसल्याचा आरोप महिला डॉक्टरांनी केला आहे. तसेच हॅास्पिटल निकृष्ट दर्जाचे जेवण देत असून कॅटिंन मध्ये बाहेरचे जेवण आणू दिले जात नाही. सलग ड्युटी करून मानसिक ताण तर येतो.

हजेरीसाठी पंचिंग करू देत नाहीत त्यामुळे आमच्या पगारातून पैसे कपात केली जात आहे. आम्ही काम करण्यासाठी तयार आहे पण व्यवस्थापनाने आम्हला काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण पुरवावे तसेच याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी लक्ष घालावे, अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.