Pimpri News: सायकल मार्गिकांच्या निर्मितीसाठी मत नोंदविण्याचा उद्या शेवटचा दिवस
'पर्यावरणाच्या रक्षणासाठी वाढवू सायकलचा वापर' असा नारा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दिला आहे. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी सायकल मार्गिकांची निर्मिती केली जाणार आहे.
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सायकलचा वापर वाढवण्यासाठी सायकल मार्गिकांची निर्मिती केली जाणार आहे. सायकल मार्गिकांच्या निर्मितीसाठी महानगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण केले जात असून या सर्वेक्षणात मत नोंदवण्यासाठी उद्या (सोमवार, दि.31) हा अंतिम दिवस आहे.
‘पर्यावरणाच्या रक्षणासाठी वाढवू सायकलचा वापर’ असा नारा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दिला आहे. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी सायकल मार्गिकांची निर्मिती केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या सायकल मार्गिकांच्या निर्मितीसाठी ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात मत नोंदवण्यासाठी उद्या (दि.31) हा अंतिम दिवस आहे.
#PCMC #Cycles4Change
सायकल वापराची जनजागृती करूया, सूचना देण्यासाठी सर्वेक्षण भरुया!आपले मत नोंदविण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आजचा आपले मत नोंदवा.पुढील लिंकवर क्लिक करा आणि सर्व्हे भरा- https://t.co/frgrDbwAi2#PCMCSmartCity #SmartSarathi #cycling #Survey pic.twitter.com/YqAjbSP3MO
— PCMC Smart Sarathi (@PCMCSarathi) August 30, 2020
महानगरपालिकेच्या वतीने या सर्वेक्षणात नागरिकांना मत नोंदवण्याचे आवाहन केले आहे. https://t.co/frgrDbwAi2 या पुढील लिंकवर क्लिक करून #Cycles4Change हा सर्व्हे भरता येईल. अथवा पालिकेच्या सारथी या मोबाइल ॲप्लिकेशन वर जाऊन हा सर्व्हे भरता येणार आहे.