Pimpri News: रुग्णवाढीला ब्रेक! शहरात आज 821 नवीन रुग्णांची नोंद, 459 जणांना डिस्चार्ज, 23 मृत्यू

शहरातील 17 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 6 अशा 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून हजाराच्या पुढे वाढणा-या कोरोनाच्या रुग्णसंख्येला आज थोडासा ब्रेक लागला आहे. शहराच्या विविध भागातील 760 आणि महापालिका हद्दीबाहेरील 61 अशा 821 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) भर पडली आहे.

शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 64 हजार 382 वर पोहोचली आहे. शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 459 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 17 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 6 अशा 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भोसरी, बीजलीनगर, कासारवाडी, जुनी, नवी सांगवी, चिखली, निगडी, मोशी, पिंपळेगुरव, सौदागर, निलख, काळेवाडी, आंबेगाव, राजगुरूनगर, कसबा पेठ, खेड येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 64 हजार 382 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 50 हजार 438 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1056 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 297 अशा 1353 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6429 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.