Chinchwad : पिंपरी-चिंचवडकरांनो जरा जपून; शहरात कोरोनासोबत पोलिसांची कारवाईही वाढतेय

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी 223 जणांवर कारवाई केली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना चांगलाच रमला आहे. दररोज जवळपास एक हजार जणांना कोरोनाची लागण होत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणा-यांची संख्या देखील  वाढत आहे, ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. 

हलगर्जीपणा करून कोरोनाची साथ वाढण्यास पोषक वातावरण तयार करणा-यांवर पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनो जरा जपूनच. कारण हलगर्जीपणा करून नियमभंग कराल, तर कोरोनाची लागण आणि पोलीस कारवाई अशा दुहेरी संकटात सापडाल.

हलगर्जीपणा करून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणे, मला काही होत नाही, ही मानसिकता ठेऊन सार्वजनिक ठिकाणी वावरणे धोकादायक ठरत आहे. मास्क न लावता फिरणे, दुकाने ठराविक वेळेपेक्षा अधिक काळ सुरु ठेवणे, दुकानांसमोर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे अशा प्रकारचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

भारतीय दंड विधान कलम 188 नुसार ही कारवाई केली जात आहे. यामध्ये कारावास, आर्थिक दंड किंवा दोन्ही एकत्र दंड होऊ शकतो. त्याचबरोबर आपले क्रिमिनल रेकोर्ड तयार होऊ शकते. याचा पुढे अनेक बाबतीत तोटा आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितपणे, काळजी घेऊन सार्वजनिक ठिकाणी वावरणे गरजेचे आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.  पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी 223 जणांवर कारवाई केली आहे.

पोलीस स्टेशन नुसार कारवाईची आकडेवाडी –

एमआयडीसी भोसरी (27), भोसरी (18), पिंपरी (25), चिंचवड (18), निगडी (11), आळंदी (20), चाकण (0), दिघी (5), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (20), वाकड (33), हिंजवडी (3), देहूरोड (6), तळेगाव दाभाडे (4), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (33), रावेत चौकी (23), शिरगाव चौकी (5)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.