Pune Rains Update: पुण्यात पुन्हा एकदा ढगफुटी, शहर जलमय! सहकारनगर-धनकवडीत 227 मि.मी. पावसाची नोंद
एमपीसी न्यूज – पुण्यात रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ओढे-नाले यांना महापूर आले असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. रस्त्यावरील अनेक वाहने पाण्यात अडकून पडली आहेत. पावसाच्या हाहाकारामुळे पुणेकरांना रात्र अक्षरशः जागून काढावी लागावी. आजची संपूर्ण रात्र जागून काढावी लागण्याची शक्यता दिसत आहे. सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तर तब्बल 227 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज होणाऱ्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा रद्द केल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. शहरात पाणी साचल्यामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक घरांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. शिरुर, अंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटरमध्ये देखील पाणीच पाणी झाले होते.
पुण्यात मुसळधार पाऊस आणि अनेक भागातील वीज गायब झाली आहे. पाषाण, कर्वे नगर या भागातील वीज गायब आहे तर बिबवेवाडी परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज माझे कुटुंब माझो जबाबदारी मोहिमेअंतर्गत गृह सर्वेक्षण स्थगित केले आहे. तसेच पुणे -सोलापूर हायवे पावसामुळे बंद केला होता. उजनी धरणाचे पाणी भिगवण, डाळज, पळसदेव, इंदापूर येथे हायवेवर आल्याने पुण्यातुन सोलापुरकडे जाणारी वाहतुक लोणी काळभोर येथे थांबवली होती. उजनी धरणाचे 42 दरवाजे उघडले आहेत.
पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस झाला. रात्रभर पावसाची संततधार सुरूच होती. मावळ तालुक्यातही रात्रभर पावसाने जोर सुरूच ठेवला तर पवना धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग करावा लागेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पवना नदी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
डूब के जाना है।#punerains #Pune #PuneRain
Heavy Rain in Pune.
Clicked at Khese park, Lohegaon road, near Airport. pic.twitter.com/qeWBeMyoYN— Rahul Sarkar🇮🇳 (@rahul007sarkar) October 14, 2020
पुणे वेधाशाळेतील (शिवाजीनगर) नोंदीनुसार सकाळी साडेआठ ते रात्री साडेअकरा या वेळेत 96 मिलिमीटर पावसाची नोंद. सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ 20 मिमी, रात्री साडेआठ ते साडेअकरा 76 मिमी. पावसाची नोंद झाली होती.
#punerains pic.twitter.com/zY9HHtAkq2
— SITESH SINHA (@sinhasitesh19) October 14, 2020
पुण्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण सुरक्षित ठिकाणी थांबा, घराबाहेर पडू नका! तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले आहे.
पुणे रेल्वे स्थानक#punerains pic.twitter.com/5PtBr5tuNj
— सुजित जाधव 𝕾𝖚𝖏𝖎𝖙 𝕵𝖆𝖉𝖍𝖆𝖛 (@sujitgr8) October 14, 2020
#punerains Warje chowk pune Mumbai Banglore highway pic.twitter.com/vPBwQmwe4w
— PK (@PuneetKhosla8) October 14, 2020
#punerains @phenioxmall pune.. now.. pic.twitter.com/MZK05v5Jbq
— Kaushik Garigipathi (@Kaushikgrn) October 14, 2020
#punerains camp Al quresh hotel pic.twitter.com/EkPAC87KVv
— Saddam Shaikh (@SaddamS67428590) October 14, 2020
Experienced the horrible thunderstorm last night! #pune #punerains #Thunderstorms #india #punenew #WeatherUpdate #WeatherReport #WeatherForecast #forecasting #TimesofIndia @timesofindia @IndianExpress @htTweets @punekarnews @punekar pic.twitter.com/xl1m7le2rg
— Hina (@rahina1908) October 13, 2020
Current situation in Chandan Nagar Police station . #punerains pic.twitter.com/L1c3Bo1vL3
— शबिर हुसेन (@shabirhussain82) October 14, 2020
Waterlogged roads …#punerains #PuneRain pic.twitter.com/FBMLjlyUqg
— मुंडा टाटावाला (@MundaTatawala) October 14, 2020
Pune last night
IITM recorded 130.3mm in the last 24 hrs.Out of which 104mm in just 2.5hrs between 9:45pm – 12:15am#punerains #PuneRain pic.twitter.com/z4h8zFRo2t— vineet kumar (@vineet_tropmet) October 15, 2020
Visuals from #HingneKhurd area in #Pune. Torrential #rain is battering the city since the morning hours of Oct 14 due to the low pressure area over #Maharashtra.
Captured by mobileclicksss on Instagram.#PuneRains #MumbaiRains #MaharashtraRains #Cyclone #CycloneWatch pic.twitter.com/TYglUWE3ez
— StormTracker India (@StormTrackerIn) October 14, 2020
Shot from my home, what you're seeing is a glaring example of the result of climate change, irresponsible encroachment river bed and terrible Drainage system (along with a lot of plastic from us). @PuneTimesOnline @IndianExpress #pune #punerains #15oct2020 #cyclone #monsoon pic.twitter.com/m9G3ds1dAQ
— Sudeep Gogate (@sudeep_almighty) October 15, 2020