Pune News : लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीवर ॲसिड टाकण्याची धमकी
तरुणाविरोधात गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज : लग्नाला नकार दिल्यामुळे संतापलेल्या तरुणाने तरुणीच्या चेहर्यावर ॲसिड टाकण्याची धमकी दिली. तसेच या तरुणीच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनंतर अरुण बाबासाहेब खडतरे या तरुणाविरोधात हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.