Nigdi Crime News : वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या स्पा सेंटरवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा ; पाच मुलींची सुटका
एमपीसी न्यूज – निगडीतील इन्सपिरिया मॉलमध्ये अमारा स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणा-या स्पा सेंटरवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. याप्रकरणी स्पा सेंटर चालक महिला व मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच पीडित मुलींची सुटका केली आहे.
याप्रकरणी स्पा सेंटरची पन्नास वर्षीय महिला व शान मेहमुद खान ( वय 36, रा. प्राधिकरण, पुणे) यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागआला निगडीतील इन्सपिरिया मॉलमध्ये अमारा स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली.
याबाबत पथकाने बनावट गि-हाईक पाठवून खात्री केली खात्री पटल्यानंतर पथकाने सोमवारी (दि.14) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान स्पा सेंटरवर छापा टाकला.
स्पा सेंटर चालक महिला व मॅनेजरवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पाच पीडित मुलींची सुटका केली आहे. आरोपींकडून 57 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.