Pimpri corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू

107 नवीन रुग्ण; 106 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (मंगळवारी, दि. 15) नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यातील एक रुग्ण शहरातील आहे. तर 8 रुग्ण शहराच्या बाहेरील आहेत. दिवसभरात 107 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर 106 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 94 हजार 639 एवढी झाली आहे. तर आजवर 91 हजार 382 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मृत्यू झालेले शहरातील रुग्ण निगडी (57 वर्ष) येथील आहे. तर शहराबाहेरील रुग्ण शिवणे (36 वर्ष), शिरूर (70 वर्ष), (70 वर्ष), न-हे (73 वर्ष), अमरावती (44 वर्ष), हिंजवडी (55 वर्ष), मुंबई (66 वर्ष), शिरोली (58 वर्ष), पेरणे (72 वर्ष) येथील आहेत.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 721 तर शहराच्या बाहेरील 707 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 760 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 776 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 99 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 हजार 678 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.