Akurdi News: महिलांना आरोग्य कार्डचे वाटप करत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

एमपीसी न्यूज – महिलांना आरोग्य कार्डचे वाटप करत आम आदमी पार्टीतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. आकुर्डी येथील पंचतारानगरमध्ये आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या हस्ते आरोग्य कार्डचे वाटप करत करण्यात आले.

नवीन वर्षातील पहिला सण म्हणून सावित्रीमाईंचा जन्मोत्सव साजरा करण्याचा कल सध्या रुजत आहे. याचेच औचित्य साधत आकुर्डीतील शुभश्री रेसिडन्सीमध्ये ‘आप’चे युवाध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन सामान्य गृहिणींच्या हस्ते करण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांची 190 वी जयंती ‘महिला मुक्ती दिन ’ म्हणून साजरी केली जाते. सावित्रीबाईंना महात्मा फुले यांनी प्रथम शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा प्रारंभ झाला. आज सावित्रीच्या लेकी सर्वत्र जगात आघाडीवर आहेत. परंतु महिला या स्वतःच्या आरोग्याविषयी कानाडोळा करतात असे प्रकर्षाने जाणवते.

त्यामुळेच महिलांनी स्वतःहून आपल्या आरोग्यासाठी जागरूक राहावे. या उद्देशाने महिलांना औषधांच्या बिलामध्ये सवलत मिळावी म्हणून या आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आल्याचे चेतन बेंद्रे यांनी सांगितले.

यावेळी परिसरातील महिलांनाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले होते. त्याचप्रमाणे आपुलकी जेष्ठ नागरिक संघातील जेष्ठ नागरिक व युवक-युवती यांची विशेष उपस्थिती होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.