Maharashtra Corona Update : आज 10,362 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रिय रुग्ण पन्नास हजारांच्या आत

एमपीसी न्यूज – राज्यात आज कोरोना बाबत दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. आज दिवसभरात 10 हजार 362 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज नव्यानं 2 हजार 765 बाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर, 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 47 हजार 011 एवढी झाली आहे. त्यापैकी एकूण 18 लाख 47 हजार 361 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 48 हजार 801सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज दिवसभरात 29 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 49 हजार 695 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.55 टक्के एवढा आहे तर, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्के एवढं झाले आहे

महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन या बद्दल माहिती दिली आहे. ‘ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील आठ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील पाच, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्वजण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे’ असे राजेश टोपे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.