Pune Crime News : वाहतूक सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण, चौघांना अटक

एमपीसी न्यूज – दुचाकीवर ट्रीपलसीट बसून प्रवास करणाऱ्याला थांबविल्याचा राग आल्यामुळे चौघांनी मिळून सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांना मारहाण केली. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री साडेआठच्या सुमारास हडपसरमधील महमंदवाडीतील सैय्यदनगर रेल्वेगेटजवळ घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

मोसिन बागवान (वय 24), फैजल वहाब अन्सारी (वय 25), शकील अद्दल अन्सारी (वय 24), शहाबाद दिलशाद अलवी (वय 24) सर्व रा. हडपसर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी फिर्याद दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड इतर कर्मचाऱ्यांसह सय्यदनगर रेल्वे परिसरात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी दुचाकीवर ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्या मोसिमनला त्यांनी अडविले. त्याचा राग आल्यामुळे त्याने राठोड यांना अपशब्द वापरुन आरडा-ओरड केली. त्यानंतर त्यांना चौघांनी मिळून राठोड यांना हाताने मारहाण केली. मध्यस्थी करणाऱ्या मंगेश रोकडे आणि सयाजी सूर्यवंशी यांनाही चौघांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.